Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमएचटी-सीईटीसाठी ४३ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 05:04 IST

१ जानेवारीपासून एमएचटी सीईटी त्याचबरोबर कृषी अभ्यासक्रम आदी परीक्षांच्या अर्ज भरण्यासाठी प्रारंभ झाला आहे.

मुंबई : १ जानेवारीपासून एमएचटी सीईटी त्याचबरोबर कृषी अभ्यासक्रम आदी परीक्षांच्या अर्ज भरण्यासाठी प्रारंभ झाला आहे. सीईटीच्या संकेतस्थळावर २१ दिवसांत ४३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, यामध्ये १४८३ अर्ज महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी केले आहेत.संकेतस्थळावर २१ दिवसांमध्ये तब्बल ५२७३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ४३७९३ विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रवेश अर्ज भरले आहेत. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहितीसाठी सीईटी सेलकडून नवे स्वंतत्र संकेतस्थळही विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.