Join us

मध्य रेल्वेवर 422 सीसीटीव्ही

By admin | Updated: September 5, 2014 02:32 IST

रेल्वे स्थानक आणि प्रवाशांची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रलयाने आयएसएसअंतर्गत (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम) सुरक्षेचे अनेक उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांत मोरे - मुंबई
रेल्वे स्थानक आणि प्रवाशांची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रलयाने आयएसएसअंतर्गत (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम) सुरक्षेचे अनेक उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सुरक्षेचे उपाय योजले जात असून, मध्य रेल्वेच्या चार स्थानकांवर  येत्या चार महिन्यांत 422 सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्याचबरोबर बॉम्बनाशक पथक आणि वाहन तपासणी करणारी यंत्रणाही या सुरक्षेअंतर्गत मध्य रेल्वेवरील आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) येणार आहे. 
रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा यंत्रणोत सुधारणा करण्यासाठी म्हणून रेल्वे मंत्रलयाने आरपीएफच्या सहकार्याने देशभरातील मोजक्याच स्थानकांवर आयएसएसअंतर्गत सुरक्षेचे उपाय योजन्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेतला. यात 202 स्थानकांची निवड करण्यात आली. यामध्ये मुंबईतील काही रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. 
या सुरक्षेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये सीएसटी, ठाणो, दादर, कुर्ला, एलटीटी आणि कल्याण स्थानकाचा समावेश आहे. सीएसटी आणि ठाणो स्थानकात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने उर्वरित चार स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याची योजना मध्यंतरी थांबली होती. त्यामुळे उपलब्ध निधीत दोन स्थानकांवरच सीसीटीव्ही आणि अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या. 
आता मात्र निधी उपलब्ध झाल्याने येत्या चार महिन्यांत उर्वरित चार स्थानकांवरही सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. असे एकूण 422 सीसीटीव्ही बसवले जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे (आरपीएफ) वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा यांनी सांगितले. या सीसीटीव्हींचा दर्जा अन्य कॅमे:यांपेक्षा चांगला असणार असल्याचे बोहरा म्हणाले. 
 
सध्या दादर, कुर्ला, एलटीटी आणि कल्याण या स्थानकांवर प्रत्येकी 50 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे कॅमेरे भाडय़ावर असून इंटीग्रेटेड सिक्युरिटीअंतर्गत येणारे नवीन कॅमेरे हे रेल्वेचे स्वत:चे असतील. इंटीग्रेटेड सिक्युरिटीअंतर्गत कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर सध्याचे भाडय़ाचे असलेले कॅमेरे काढण्यात येणार आहेत.  
 
बॉम्बनाशक पथक आणि वाहन तपासणी यंत्रणाही येणार : वाहनांची खालच्या बाजूने तपासणी करणारी यंत्रणाही मध्य रेल्वे आरपीएफकडे येणार आहे. ही यंत्रणा पहिल्यांदाच मुंबई विभागात येत आहे. बॉम्बनाशक पथकही चार ते पाच महिन्यांत येईल. हे पथक सीएसटीवर तैनात असेल. तीन डॉग्ज स्क्वॉडही या महिन्यात येतील, असेही बोहरा यांनी सांगितले.