Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठ वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ४०४ कोटी

By संतोष आंधळे | Updated: March 19, 2024 21:12 IST

वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता

मुंबई : राज्यात नव्याने सुरु होणाऱ्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या ८ नवीन शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय सलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय बांधकाम करण्यासाठी प्रत्यकी ४०४ कोटींची मान्यता वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. त्यासोबत जळगाव येथील दंत महाविद्यालयास १३३ कोटींची मान्यता देण्यात देण्यात आली आहे.

 राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रमाणात देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विविध संस्थांचे श्रेणीवर्धन करणे,शिक्षण व संशोधन विकसित करणे, अधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे. औषधांचा साठा योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर प्रशासकीय गतीमानता वाढविणे.नुकतीच मोठ्या प्रमाणावर नोकर भरती राबविण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत असून याचाच भाग म्हणून ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्यकी ४०४ कोटींची मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ,अमरावती जालना,परभणी,बुलढाणा , भंडारा,हिंगोली,गडचिरोली या महाविद्यालयांना प्रत्येकी ४०३.८९ कोटी तर ५० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय जळगावसाठी १३३.६६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 खटांचे रुग्णालय, वसतीगृह, निवासस्थाने व इतर अनुषंगिक इमारतीचे बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली  आहे.

टॅग्स :मुंबई