Join us

मुंबईत ४० हजार, तर राज्यात ३ लाख काेराेना डोसचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात लसीकरणाच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण प्रक्रियेत आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यभरात लसीकरणाच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण प्रक्रियेत आतापर्यंत मुंबई ४० हजार तर राज्यात तीन लाख लसींच्या डोसचा वापर झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. येत्या आठवड्यात राज्यासह मुंबईत पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या नोंदणीसाठी मंगळवारपासून कोविन ॲपवर सज्ज असणार आहे.

पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, २.२५ लाख डोस उपलब्धतेपैकी मुंबईत १० दिवसांत लसीचे ४० हजार डोस वापरण्यात आले आहेत. तर राज्याकडे १८ लाख डोसचा साठा उपलब्ध झाला होता, त्यापैकी तीन लाख डोस वापरण्यात आले आहेत. भविष्यात लसीकरण प्रक्रियेला मिळत असलेली गती पाहता लवकरच लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ कऱण्यात येणार आहेत. सध्या शहर उपनगराकरिता १ हजार ३०० लसीकरण अधिकारी कार्यरत असल्याने लसीकऱण प्रक्रियेची क्षमता वाढविल्यास कुठलाही अडथळा येणार नाही.

सध्या राज्यात सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे, तर एकूण ५४० लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. कोव्हिशिल्ड घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्याला कोणतेही संमतीपत्र देण्याची गरज नाही. मात्र, कोव्हॅक्‍सिनची लस घेण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्याला संमतीपत्र देणे बंधनकारक केले आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस दल, अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.

......................