अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीठाणे भारत स्काऊट-गाइड्सची राष्ट्रीय एकात्मता रॅली दिल्ली-आग्रा आणि फतेहपूर सिक्री येथे २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. या रॅलीमध्ये ठाणे जिल्ह्यातील स्काऊट-गाइडच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती-पंतप्रधान भेटीचा योग आल्याचा आनंद शेकडो विद्यार्थ्यांना आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी जरी ‘चलो दिल्ली’चा नारा दिलेला असला तरीही तो कोणत्याही आंदोलनासाठी-मागण्यांसाठी नसून तो देशाच्या परमोच्च पदावर असलेल्या महनीय व्यक्तींना भेटण्याचा आहे, हे या रॅलीचे विशेष असल्याचे (राज्यपाल) राज्य पुरस्कार विजेत्या स्रेहल खंडीझोड आणि कथा मोरे या युवतींनी ‘लोकमत’ला सांगितले.यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल ४०० विद्यार्थ्यांत डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. येथील टिळकनगर विद्यालय- ४०, मॉडेल इंग्लिश स्कूल- १०, चंद्रकांत पाटकर- २०, गांधीनगरच्या होली एंजल्स स्कूलचे २० आदींसह अन्य शाळांमधील विद्यार्थी तेथे जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत संसद भवन येथे राष्ट्रपती-पंतप्रधानांची सदिच्छा भेट होणार असून स्वच्छ भारत अभियानांतर्गत या विद्यार्थ्यांचा उपक्रम घेण्यात येईल. संसद भवनातील प्रश्नकाल, अधिवेशन कसे चालते हे जाणून घेण्यासह तीन दिवसांच्या मुक्कामात आग्रा, फतेहपूर सिक्री आदींसह बहुतांशी सर्व प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार असल्याचे होली एंजल्सचे राजू घुले, भास्कर भाविक या स्काऊट मास्टर यांनी स्पष्ट केले. या सर्वांचा विमा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुख्याध्यापक ओमेन यांनी चर्चा करून संसद भवनाची शिस्त, सांगून एकजुटीचा कानमंत्र दिला.६ वर्षांच्या प्रयत्नाला यशजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रपती-पंतप्रधान यांची भेट व्हावी, यासाठी स्काऊट-गाइडचे जिल्हा आयुक्त संतोष दुसाने गेली ६ वर्षे प्रयत्न करीत होते. त्या प्रयत्नानंतर यंदा त्यांना ही संधी मिळाल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे.
४०० विद्यार्थी राष्ट्रपती-पंतप्रधान भेटीला
By admin | Updated: February 16, 2015 23:08 IST