Join us

४० टक्के ऑटो, अ‍ॅप आधारित कॅब रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:45 IST

महानगर गॅसचा अभ्यास : अनलॉकमध्ये वाहतूक वाढतेय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होती. पण आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. ४३ टक्के रिक्षा, तर ४० टक्के अ‍ॅप आधारित कॅब रस्त्यावर असल्याचे महानगर गॅसच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात मुंबईत कमी वाहने रस्त्यावर होती. त्यामुळे शहरातील लहान आणि मोठ्या रस्त्यावरील सिग्नल फ्लॅशमोडवर ठेवण्यात आले. पण जूनपासून सर्व सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. अनेक कार्यालये, दुकाने सुरू झाली असून आता वाहतूक पुन्हा पूर्ववत होत आहे.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची संख्याच्२.३ लाख रिक्षांपैकी १ लाख रिक्षा रस्त्यावर आहेत. हे प्रमाण ४३ टक्के आहे.च्८० हजार अ‍ॅप आधारित कॅबपैकी ३२ हजार कॅब रस्त्यावर असून, हे प्रमाण ४० टक्के.च्३८ हजार काली पिवळी टॅक्सीपैकी २० हजार टॅक्सी नियमित सुरू आहेत.आता सध्या रस्त्यावर१० हजार टॅक्सी धावत असून हे प्रमाण ५० टक्के आहे.सीएनजी भरण्यास येणाऱ्या वाहनांची संख्यारिक्षा ३.५ लाख (मुंबईत २.३लाख)खासगी कार ३.२ लाखटॅक्सी ६६ हजार (मुंबईत ३८ हजार)बस आणि ट्रक ५ हजारमिनीबस टेम्पो ४ हजार ८००दुचाकी ३००

टॅग्स :मुंबई