Join us

दादर स्थानकात पकडले 36 तासांत 4 हजार फुकटे

By admin | Updated: August 8, 2014 00:47 IST

विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेचा महसूल बुडवला जात असल्याने अशा प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई केली जाते.

मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेचा महसूल बुडवला जात असल्याने अशा प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई केली जाते. अशा प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेकडून दादर स्थानकात नुकतीच विशेष मोहीम उघडण्यात आली. यामध्ये 36 तासांत तब्बल 4 हजार 199 फुकटे प्रवासी आढळल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. 
पश्चिम रेल्वेमार्गावरून दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये लाखो प्रवासी विनातिकीट प्रवास करतानाही आढळतात. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करीत रेल्वे मोठय़ा प्रमाणात महसूल गोळा करते. काही वेळेला रेल्वेकडून महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकांवर फुकटय़ा प्रवाशांविरोधात विशेष मोहीमही उघडली जाते. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी दादर स्थानकात फुकटय़ा प्रवाशांविरोधात 36 तासांची मोहीम उघडण्यात आली. तसेच दादर ते बोरीवली दरम्यान धावणा:या लोकलमध्येही ही मोहीम उघडली. या मोहिमेत 316 टीसी, 32 रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी सामील झाले होते. त्यांच्याकडून केलेल्या कारवाईत 4 हजार 119 फुकटय़ा प्रवाशांना पकडले. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून 9 लाख 40 हजार रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले. (प्रतिनिधी)