Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळले

By admin | Updated: June 9, 2014 01:40 IST

शहरातील तुंबलेलीे गटारे व साफ होणाऱ्या गटारातील कचऱ्याची योग्यवेळी विल्हेवाट न लावणे तसेच स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे

रोहा : शहरातील तुंबलेलीे गटारे व साफ होणाऱ्या गटारातील कचऱ्याची योग्यवेळी विल्हेवाट न लावणे तसेच स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासंच्या वाढीमुळे मागील चार महिन्या नंतर पुन्हा एकदा शहरातील अष्टमी विभागात डेंग्यूचे चार रुग्ण आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रोहे नगरपालिकेतील आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा पुन्हा समोर आला. शहर व तालुक्यात सध्या ताप, थंडी, सर्दी, खोकला, काविळ, थकवा, टायफॉइड, मलेरिया अशा रोगांनी नागरिक त्रस्त असताना नगरपालिका हद्दीतील अष्टमी वरचा मोहल्ला येथील अ. मजीद धनसे (वय ५६), सरवरी अ. मजीव धनसे (४९), फैरोजा आझम मुजावर (३८), कु. हुजेफा आझम मुजावर (९) या चौघांना डेंग्यू रोग झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. सदरचे वृत्त पसरताच गावात भीतीचे वातावरण पसरले आहे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या या सुस्त कारभारामुळे रोहेकर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.चार महिन्यापूर्वी दस्तुरखुद्द नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या कुटुंबातील चार तर प्रभागातील विचारे, जाधव, घरत, म्हसके, नरे कुटुंबातील दहा जणांना रोहे मोहल्ल्यातील तिघांना तसेच बाजारपेठेतील व्यापारी बांधवाना डेंग्यू रोगांनी ग्रासले होते. (वार्ताहर)