Join us

निवडणुकीच्या आखाड्यात १३ पक्षांचे ३८५ उमेदवार

By admin | Updated: April 12, 2015 00:08 IST

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम आखाड्यात अधिकृत अशा राजकीय पक्षांचे ३८५ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम आखाड्यात अधिकृत अशा राजकीय पक्षांचे ३८५ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. यात राष्ट्रवादीचे १०७, काँगे्रसचे ९२, शिवसेना - ६८, भाजपा - ४३, शेकाप - ३६, रिपाइं - १४, बसपा - १४ आणि आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (३), शिवसंग्राम (२), राष्ट्रीय समाज पक्ष (४) धर्मराज्य पक्ष (१), भारिप (१) व हिंदुस्थान मानव पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. महापालिकेचे एकूण १११ प्रभाग असून सत्ताधारी राष्ट्रवादीचे १०७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या एका उमेदवाराचा तीन अपत्यांमुळे अर्ज बाद झाला. तर इतर ठिकाणी त्यांना योग्य उमेदवार मिळालेला नाही. तर राष्ट्रीय काँग्रेसने ९१ ठिकाणी उमेदवार उभे केले असून त्यांना वीस ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. युतीच्या जागा वाटपात आलेल्या ६८ जागेवर शिवसेनेचे उमेदवार असून ४३ जागेवर भाजप यावेळी नशीब आजमावित आहे. शेकापनेही यंदा विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३६ उमेदवार उभे केले आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंने १७ उमेदवारांची यादी घोषित केली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांचे १४ उमेदवार रिंगणात आहेत. तर मायावतींचा बसपाही १४ प्रभागातून निवडणूक लढवत आहे. (प्रतिनिधी)