मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार २७५ घरांची लॉटरी २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या लॉटरीत सहभागी होण्यासाठी सोमवार सायंकाळपर्यंत ३८ हजार ३९५ अर्जदारांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर १८ हजार ६६८ अर्ज दाखल झाले असून, ४ हजार ९७ अर्जदारांनी भरले पैसेही भरले असल्याने येत्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाने जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये विरार येथील ३ हजार ७५५ घरांचा समावेश आहे, तर बाळकुम- ठाणे येथील १९, मीरारोड येथील ३१0, कावेसर-ठाणे येथील १६४ व वेंगुर्ला येथील २७ घरांचा समावेश आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी आॅनलाइन नोंदणी १३ जानेवारीपासून सुरू झाली असून, अर्जदारांना ७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
म्हाडा लॉटरीसाठी ३८ हजार ३९५ जणांची नोंदणी
By admin | Updated: January 19, 2016 04:01 IST