Join us

३७६ मंडळांना परवानगी नाकारली

By admin | Updated: September 13, 2015 03:02 IST

गणेशोत्सव चार दिवसांवर आला असतानाही शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही़ तर, ४८८ मंडळांना परवानगी मिळाल्याने

- महापालिकेची ४८८ मंडळांना परवानगी

मुंबई : गणेशोत्सव चार दिवसांवर आला असतानाही शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही़ तर, ४८८ मंडळांना परवानगी मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शहरात सर्वत्रच गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी मंडप लागले असून, काही मंडळांचे देखावे पूर्ण झाले आहेत. गणेशोत्सवात मंडप लावण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून तिसऱ्या टप्प्यात महापालिकेकडे १,९११ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले होते. यापैकी ४८८ मंडळांना मंडप घालण्याची परवानगी देण्यात आली आहे; तर, ३७६ मंडळांना परवानगी दिली नाही़ तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक अर्ज जी नॉर्थ विभागातून १४४, पी नॉर्थ विभागातून १४१ आणि के पूर्व विभागातून १२८ अर्ज आले होते. आत्तापर्यंत ९११ मंडळांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तर, वॉर्डकडून १८७ मंडळांना परवानगी दिलेली नाही.