Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५ जागांसाठी ३७ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: March 12, 2015 22:35 IST

कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. एकूण १५ जागांसाठी ३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी

कर्जत : कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. एकूण १५ जागांसाठी ३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून १९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. असे असले तरी अनुसूचित जाती जमातीची राखीव जागा बिनविरोध निवडून आल्याने १४ जागांसाठी मतदान होईल.या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघात ८ जागांसाठी १९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यापैकी तीन चार अपवाद सोडता बाकी सर्व जण सहकारामध्ये अनेक पदे सांभाळलेले उमेदवार आहेत. म्हणजे तेच तेच चेहरे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संस्था सदस्यांसाठी असलेल्या मतदार संघात दोन जागांसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या मतदार संघात दोन जागांसाठी सहा उमेदवार आहेत. इतर मागास प्रवर्गाच्या मतदार संघात एका जागेसाठी तीन उमेदवार आहेत तर विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील एका जागेसाठी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघासाठी एका जागेकरिता सखाराम काळू रोकडे यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. (वार्ताहर)