Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल ट्रायडंटमधून ३६ लाखांच्या घड्याळांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2015 05:00 IST

मरिन ड्राइव्ह परिसरातील हॉटेल ट्रायडंटमधून तब्बल ३६ लाखांच्या घड्याळांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मरिन्स लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल

मुंबई : मरिन ड्राइव्ह परिसरातील हॉटेल ट्रायडंटमधून तब्बल ३६ लाखांच्या घड्याळांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मरिन्स लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.हॉटेलच्या गॅलरीमध्ये महिन्याभरापूर्वी ही ३६ लाख ४४ हजारांची घड्याळे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅलरीला लावण्यात आलेले कुलूप तोडून ही घड्याळे लंपास केली. दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब हॉटेल प्रशासनाला सांगितली. त्यानुसार त्यांनी मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रण तपासल्यानंतर यामध्ये तीन विदेशी इसम ही चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. मात्र हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या दर्जाचे नसल्याने यामध्ये या आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. या हॉटेलमधील सुरक्षा नेहमीच कडक असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.