Join us

मुंबई विमानतळावर ३६ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:05 IST

मुंबई : शारजा येथून शनिवारी मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका प्रवाशाकडून ३६ लाख ५९ हजारांच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोन्याच्या वस्तू ...

मुंबई : शारजा येथून शनिवारी मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका प्रवाशाकडून ३६ लाख ५९ हजारांच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोन्याच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.

शारजाहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्याकडे बऱ्याच महागड्या वस्तू आढळून आल्या. त्या वस्तू भारतात आणण्यासाठी त्याने सीमाशुल्क भरले नव्हते किंवा वैध खरेदीपत्रकेही त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे या वस्तू ताब्यात घेत जप्त करण्यात आल्या. त्यात आयफोन, ॲपल कंपनीची घड्याळे, लॅपटॉप, गोप्रो कॅमेरे आणि २४ कॅरेट सोन्याचे कडे आशा वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचे बाजारमूल्य तब्बल ३६ लाख ५९ हजार ९८१ रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.