Join us

३५,२६० कर्मचारी तैनात

By admin | Updated: October 6, 2014 00:00 IST

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ६,१७५ मतदान केंद्रांवर ३५ हजार २६० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी प्रशासनाने केले आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ६,१७५ मतदान केंद्रांवर ३५ हजार २६० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी प्रशासनाने केले आहे. या मतदान केंद्रांवरील सुमारे ५९ लाख मतदारांची सेवा या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे.जिल्ह्यातील निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे ४० हजार ५०० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, मतदार केंद्रांवर सुमारे ३५ हजार २६० कर्मचारी प्रत्यक्षात काम करणार आहेत. याशिवाय, केंद्रांबाहेर व अन्य कारणांसाठी सुमारे नऊ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. ऐन वेळी कोणी आजारी पडले किंवा अन्य काही कारणास्तव गैरहजर राहिल्यास त्या जागी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे शिक्षक, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, भिवंडी या सहा महापालिका आणि अंबरनाथ व बदलापूर या दोन नगरपालिकांचे कर्मचारी, सिडको , एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़