Join us

राज्यात माहिती अधिकाराची ३५ हजार प्रकरणे प्रलंबित; पुण्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:04 IST

माहिती अधिकारात दाखल झालेली तब्बल ३५ हजारांवर प्रकरणे आजमितीस राज्यात प्रलंबित आहेत.

- यदु जोशी मुंबई : माहिती अधिकारात दाखल झालेली तब्बल ३५ हजारांवर प्रकरणे आजमितीस राज्यात प्रलंबित आहेत. सर्वाधिक ८ हजार ७४६ प्र्रकरणे पुणे आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असून बृहन्मुंबई आणि नागपुरात मात्र प्रकरणांचा गतीने निपटारा होत आहे.औरंगाबादचे राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्याकडे नागपूरचाही पदभार आहे. चालू महिन्याचे अर्ज सोडले तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये आज झीरो पेंडन्सी आहे. सुनावणीला येणारी ७०-८० प्रकरणे ते आदल्या दिवशी अभ्यासून घेतात. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी लवकर होते. सुनावणीदरम्यान अर्जदाराने खुलासा करण्याची गरज नाही, असे सांगत धारुरकर वेळ वाचवतात. सुनावणी रखडू नये म्हणून पुढची एक तारीख देतात. त्याचबरोबर बृहन्मुंबईचे आयुक्त ए. के. जैन यांनीही प्रकरणांचा निपटारा जलद सुरू केला आहे. मात्र, पुणे, अमरावती आयुक्त कार्यालयांकडे प्रकरणे पडून असल्याचे दिसते.