Join us

३५० इमारती धोकादायक!

By admin | Updated: May 8, 2015 00:18 IST

महापालिका हद्दीत ३५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती असून पावसाळ्यापूर्वी इमारतींना नोटिसा देऊन कारवाई करण्यात येणार आहे.

उल्हासनगर : महापालिका हद्दीत ३५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती असून पावसाळ्यापूर्वी इमारतींना नोटिसा देऊन कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेच्या कारवाईने हजारोंचे जीव टांगणीला लागले असून अतिधोकादायक इमारतींवर पाडकाम कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता भठिजा यांनी दिली आहे. दरम्यान, शहरात दोन मजली इमारती व चाळींचे बांधकाम अनधिकृतपणे राजरोस सुरू आहे.उल्हासनगरात धोकादायक इमारती कोसळून गेल्या चार वर्षांत २३ जणांचा बळी गेला आहे. १९९२ ते ९५ या काळात रेतीच्या तुटवड्यामुळे दगडांचा चुरा व वालवा रेतीपासून इमारतींची बांधकामे झाली आहेत. वालवा रेती व दगडांच्या चुऱ्यापासून झालेली बांधकामे धोकादायक होत असून त्यांची संख्या ३५० वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ३२४ पैकी २७ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. (प्रतिनिधी)