Join us

जोगेश्वरीतून ३५ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:06 IST

अवैध साठा करणाऱ्याला अटक; १२ ऑक्सिजन कीट सापडलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असतानाच ...

अवैध साठा करणाऱ्याला अटक; १२ ऑक्सिजन कीट सापडले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यभरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असतानाच ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्याला गुन्हे शाखेने जोगेश्वरीतून अटक केली. त्याच्याकडून ३५ ऑक्सिजन सिलिंडर, १२ ऑक्सिजन कीट जप्त करण्यात आले. जोगेश्वरी येथील ऑल इंडिया हेल्थ केअर शॉपमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांना मिळाली हाेती. त्यानुसार, गुन्हे शाखेने गुरुवारी छापा टाकून कारवाई केली. यात २५ ऑक्सिजन सिलिंडर आणि १२ कीट जप्त करण्यात आले. गोडाऊन मालकाला अटक करण्यात आली असून त्याला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी गोरेगावचा रहिवासी आहे. त्याने तो साठा मीरा-भाईंदर येथून आणल्याचे सांगितले. दोघांविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

....................................