Join us  

वर्षभरात रेल्वे अपघातांत ३३४ महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 5:24 AM

गेल्या वर्षभरात मुंबई आणि उपनगरात १ हजार ३१ महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागले. यात ३३४ महिलांचा मृत्यू झाला असून ६९७ महिला जखमी झाल्या आहेत.

- महेश चेमटेमुंबई : गेल्या वर्षभरात मुंबई आणि उपनगरात १ हजार ३१ महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागले. यात ३३४ महिलांचा मृत्यू झाला असून ६९७ महिला जखमी झाल्या आहेत.रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, रेल्वे रूळ ओलांडणे, गर्दीमुळे लोकलमधून खाली पडणे, खांबाला आदळून अपघात ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. यात रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे वर्षभरात १८४ महिलांचा मृत्यू तर ६२ महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. गर्दीमुळे चालत्या लोकलमधून बाहेर पडून ५८ महिला प्रवाशांना जीव गमवावा लागला असून २७६ महिला जखमी झाल्या आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महिला प्रवाशांच्या मृत्यूचा आकडा ३०० च्या वरच आहे. २०१५ साली ३६९, २०१६ मध्ये ३६४ व २०१७ साली ३३४ महिला प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत.सध्या रेल्वेमध्ये महिला सुरक्षिततेची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. अ‍ॅप, टोल फ्री क्रमांक आणि अन्य मार्गाने १० टक्केच सुधारणा झाल्या आहेत, असे महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे म्हणाल्या.टॉकबॅक, सीसीटीव्ही यांसारख्या गोष्टींपेक्षा महिला विशेष बोगींची संख्या वाढवणे सर्वात महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या उपाध्यक्ष सोनल वसईकर यांनी दिली.केवळ ‘मन की बात’ करून महिला सशक्तीकरण करणे शक्य नाही. प्रत्यक्षात काम करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत रेल्वे पोलिसांची ३ हजार ३४७ पदे रिक्त आहेत.- समीर झवेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता

टॅग्स :मुंबई लोकलअपघात