नवी मुंबई : बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्याचे मंडळाने ठरवले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पध्दतीने अर्ज भरावयाचे असून ही आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई विभागातील एकूण ३ लाख ३० हजार ७०८ अर्ज दाखल झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. विलंब शुल्कासह हे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत.या परीक्षेला नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पध्दतीने अर्ज भरले आहेत. या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह (३० रुपये) अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार अल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. (प्रतिनिधी)
बारावी परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३,३०,७०८ अर्ज
By admin | Updated: November 9, 2016 04:21 IST