Join us

जिल्ह्यात कृषीला ३२३ कोटी

By admin | Updated: March 27, 2015 22:49 IST

आगामी आर्थिक वर्षाच्या १ हजार ४७५ कोटी रुपयांच्या रायगड जिल्हा पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अलिबाग : आगामी आर्थिक वर्षाच्या १ हजार ४७५ कोटी रुपयांच्या रायगड जिल्हा पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातील २१.९० टक्के म्हणजे ३२३ कोटी रुपयांची तरतूद कृषी क्षेत्राकरिता करण्यात आली आहे. गृहनिर्माण व शैक्षणिक क्षेत्राकरिता ९४७.५३ कोटी रु पयांची तर एमएसएमई क्षेत्रासाठी १६९.७३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्याची जबाबदारी, शासन नियुक्त जिल्हा अग्रणी बँक असणाऱ्या बँक आॅफ इंडियाची असते. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या शुक्रवारी रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, हा आराखडा सादर करण्यात आला. त्यावेळी बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक लिंगराज बिसोई, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक टी. मधुसूदन, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोजकुमार मून, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक नंदा सुरवसे आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. या अंतर्गत अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी क्षेत्रीय कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण जिल्हाभरात ६१ शाखांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. ४बँकेने ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३ हजार ३१३ ग्रामीण बेरोजगारांना, तरुण-तरु णींना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे. जिल्हा अग्रणी कार्यालयातच ‘आर्थिक साक्षरता केंद्र’ गेल्या आॅगस्ट २०१२ पासून सुरू केले आहे.४मासेमारी व्यवसाय, गणेशमूर्ती निर्मिती, सोलर लाइट, वॉटर हिटर, कुक्कुट पालन उद्योग इत्यादीसाठी क्षेत्रीय योजना बँकेद्वारे सादर करण्यात येणार आहे. शेतीच्या विकासासाठी विशेष पंचसूत्री योजनांची ओळख शेतकऱ्यांना करून देण्यात आली आहे.