१६ टक्के विद्यार्थी प्रवेशाविना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेरोनाचा प्रादुर्भाव तसेच लांबलेली प्रवेश प्रक्रिया यामुळे यंदा अकरावीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी मुंबई विभागात एकूण ८४ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत तर अद्याप सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. १६ टक्के विद्यार्थ्यांनी म्हणजेच ४० हजार ६७० विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेश घेतलेले नाहीत.
मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. यानंतरही काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसून प्रवेशासाठी विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर प्रवेशाच्या अखेरच्या फेरीनंतर एक लाख दोन हजार १८१ म्हणजे एकूण जागांच्या ३१.८९ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन प्रक्रियेतील ८० हजार ९९० तर इन हाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील मिळून २१ हजार १९१ जागा रिक्त राहिल्या आहेत.
.................