Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यांसाठी ३२ कोटींची पाणीयोजना

By admin | Updated: March 10, 2015 22:39 IST

राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे ६६६ गावपाड्यांच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी ३२ कोटी चार लाख रूपये खर्चून नळ पाणी

सुरेश लोखंडे, ठाणेराष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे ६६६ गावपाड्यांच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी ३२ कोटी चार लाख रूपये खर्चून नळ पाणी पुरवठा योजना हाती हाती घेतल्या आहेत. यातील बहुतांशी योजना पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सांगितले जात आहे. ग्रामीण व दुर्गम भागतील गावकऱ्याना सुरळीत पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहेत. वर्षानुवर्षाची त्यांची पाणी समस्या सोडवणे शक्य व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय पेय जल योजना हाती घेण्यात आली. त्याव्दारे ६६६ नळ पाणी पुरवठा योजना मागील वर्षी घेण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या नियंत्रणात या योजनांचे कामे सुरू आहेत.जास्तीत जास्त जुन्या विहिरींची दुरूस्ती, फार थोड्या प्रमाणात नव्या विहिरींचे कामे हाती घेतले आहेत. नादुरूस्ती पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, ेगरज असलेल्या ठिकाणीच नवी पाईप लाईनचे काम या योजनेतून घेण्यात आले आहेत. या वर्षाच्या नियोजन अद्याप झाले नसून ते लवकरच होणार असल्याचे जिल्हा परिषदेव्दारे नमुद करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये सुमारे ४३३ नळ पाणी पुरवठा योजना होती घेतल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुमारे २३३ योजनांची कामे गांवपाड्यांमध्ये सुरू आहेत. यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या सुमारे ७७ योजनांपैकी ३५ पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहेत. तर एमजेपीव्दारे १६ योजनांचे काम युध्द पातळीवर सुरू आहेत. नव्याने १०६ जिल्हा परिषदेने तर ३४ योजना एमजेपीने हाती घेतल्या आहेत.