Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यांसाठी ३२ कोटींच्या पाणीयोजना

By admin | Updated: March 11, 2015 00:14 IST

राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे ६६६ गावपाड्यांसाठी ३२ कोटी चार लाख रूपये खर्चाच्या नळ पाणी योजना

सुरेश लोखंडे, ठाणे
राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे ६६६ गावपाड्यांसाठी ३२ कोटी चार लाख रूपये खर्चाच्या नळ पाणी योजना हाती घेतल्या आहेत. यातील काही योजना पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील गावकऱ्याना सुरळीत पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहेत. वर्षानुवर्षाची त्यांची पाणी समस्या सोडवणे शक्य व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय पेय जल योजना हाती घेण्यात आली.
त्याव्दारे या ६६६ नळ पाणी पुरवठा योजना मागील वर्षी घेण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणात उर्वरित योजनांची कामे सुरू आहेत, असेही या यंत्रणांनी स्पष्ट केले.