मुंबई : ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने आठ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व लोकल चर्चगेट ते विरार व विरार ते चर्चगेट अशा बारा डब्यांच्या धावतील. चर्चगेटहून मध्यरात्री १.१५ वा., १.५५ वा., २.२५ वा., ३.२0 वा. ट्रेन सोडण्यात येईल. त्यानंतर विरारहून विशेष ट्रेन 00.१५ वाजता, 00.४५ वा., १.४0 वाजता व २.५५ वा. सोडण्यात येणार असल्याचे परेकडून सांगण्यात आले. या सर्व लोकल धीम्या असतील. मध्य रेल्वेच्याही लोकलमध्य रेल्वेनेही चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीहून कल्याणसाठी मध्यरात्री दीड वाजता लोकल सुटून कल्याणला तीन वाजता पोहोचेल. तर सीएसटीहून पनवेलसाठी याच वेळेनुसार लोकल सोडली जाईल आणि ही लोकल पनवेल येथे मध्यरात्री २.५0 वाजता पोहोचेल. तसेच कल्याणहून मध्यरात्री दीड वाजता लोकल सुटून सीएसटी येथे तीन वाजता पोहोचेल. तर पनवेलहून याच वेळेत लोकल सोडून सीएसटी येथे २.५0 वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल
By admin | Updated: December 31, 2014 02:08 IST