Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोशीच्या श्री समर्थ सोसायटीच्या 310 नागरिकांना मिळाले सुसज्ज उद्यान

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 1, 2024 18:54 IST

सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.

मुंबई: नवीन दिंडोशी श्री समर्थ को, ऑप, हौ, सोसायटी फेडरेशन लिमिटेड ई क्र,२/३, आयटी  पार्क जवळ, मालाड (पूर्व) येथील 310 नागरिकांना मिळाले सुसज्ज उद्यान मिळाले आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे स्थानिक खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या खासदार फंडातून सुशोभीकरण करण्यात आलेल्या श्री समर्थ गार्डन उदघाटन समारोह त्यांच्या हस्ते काल रात्री संपन्न झाला.

श्री समर्थ फेडरेशन अंतर्गत ई, क्र,२/अ,ब,क,ड,ई, आणि ई, क्र,३/अ, ब, क, ड, ई, (संयुक्त ) अश्या १० सोसायटी येत असून सुमारे ३१० फ्लॅट आहेत आणि १५०० ते १६०० लोकसंख्या असलेली कॉलनीच्या मध्यभागी  २००६ पासून २००x८० फूट जागा पडीक होती. त्या जागी सुसज्य उद्यान खासदार फंडातून बांधण्यात आले.त्यामध्ये जेष्ठ नागरिक कट्टा,लहान मुलांना मैदान, खेळणी, हिरवळ, तसेच गार्डन लॅम्प, कार्यक्रम साठी सभामंडप अशा सोयी करण्यात आल्याची माहिती श्री समर्थ फेडरेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध कला दिग्दर्शक  सुनील थळे यांनी दिली.

यावेळी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. विशेष आकर्षण असलेल्या  होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा कार्यक्रम स्वरीता आर्टचे संतोष लिंबोरे यांनी सादर केला.यावेळी सोसायटीतील महिलांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी खासदार गजानन कीर्तिकर तसेच विभागप्रमुख  गणेश शिंदे,उपविभागप्रमुख सुदाम आव्हाड, विभाग समन्वयक विष्णू सावंत, उप शाखाप्रमुख शैलेश शेट्ये,महिला उप शाखाप्रमुख प्रणाली पेंडूरकर आदी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सुनील थळे यांनी आयोध्या श्री राम मंदिरचे सुबक स्मृती चिन्ह देऊन केला.

टॅग्स :मुंबई