अलिबाग :रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघासाठी बेल या कंपनीची तीन हजार मतदान यंत्ने जिल्ह्यात दाखल झाली असून लवकरच ती संबंधित मतदारसंघात पाठविण्यात येतील, अशी माहिती ई.व्ही.एम. व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा रोहा उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिका:यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे ई.व्ही.एम. या तीन विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी कर्नाटक राज्यातील 19 जिल्ह्यातून 3 हजार मतदान यंत्ने जिल्ह्यात आणण्यासाठी 8 महसूल व 8 पोलीस अधिका:यांची पथके रोहा प्रांताधिकारी तथा ई.व्ही.एम. व्यवस्थापन समिती प्रमुख सुभाष भागडे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्यात पाठविली होती. या पथकातील काही पथके ई.व्ही.एम. घेऊन जिल्ह्यात दाखल झाली असून उप जिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांच्या मार्गदर्शनात ही यंत्ने जमा करु न घेण्यात येत आहेत. प्राप्त झालेली ई.व्ही.एम. आधुनिक असून यास प्रिंटर जोडण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच हे मशीन्स नादुरूस्त होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. (विशेष प्रतिनिधी)