Join us  

मुंबईत वर्षभरात उच्च रक्तदाबाचे ३३ हजार; मधुमेहाचे ३१ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 2:59 AM

प्रजा संस्थेचा अहवाल

मुंबई : बदलती जीवनशैली आणि आहारामुळे मुंबईकरांना विविध आजारांनी ग्रासले असल्याचे नुकतेच प्रजा संस्थेच्या अहवालात उघड झाले आहे. गेल्या वर्षभरात शहर-उपनगरात मधुमेहाचे ३१ हजार ४८० रुग्ण आढळले आहेत, तर उच्च रक्तदाबाच्या ३३ हजार ९७० रुग्णांची नोंद केली आहे. मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.प्रजा संस्थेच्या अहवालानुसार, उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक रुग्ण पालिकेच्या ‘डी’ विभागात म्हणजेच ग्रँट रोड परिसरात २ हजार २५ आहेत. तर गोरेगावच्या ‘पी/दक्षिण’ विभागात सर्वात कमी ७६ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल कुर्ला परिसरात एल प्रभागात १ हजार ९०९ , के/ई प्रभाग अंधेरी परिसरात १ हजार ५२८ एवढे रुग्ण आढळले आहेत. शहर उपनगरातील १० विभागात जवळपास हजारहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पालिकेच्या दवाखान्यांत ६४ टक्के रुग्णांचे तर रुग्णालयांमध्ये १७ टक्के रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. मधुमेहाच्या रुग्णांचेही सर्वाधिक म्हणजेच १ हजार ८३१ हे प्रमाण कुर्ला परिसरात आहे. ग्रँट रोड परिसरात १ हजार ८०० रुग्ण, कांदिवलीत १ हजार ४५७ रुग्णांचे निदान झाले आहे. पालिकेच्या रुग्णालयात ६० टक्के मधुमेहाचे रुग्ण आढळले असून १७ टक्के रुग्णांचे निदान पालिकेच्या दवाखान्यात झाले आहे.रुग्णसंख्यावर्ष        मधुमेह     उच्च रक्तदाब२०१४   ४५,६५७     ३६,३६१२०१५   ३५,०९८      ३६,२७३२०१६   ३२,८६६      ३७,९१८२०१७   ३१,३०५       ३४,६७३२०१८   ३१,४८०       ३३,९७०पौष्टिक आहाराचा अभावयाविषयी मधुमेहतज्ज्ञ डॉ. अशोक पारिख यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत वेगाने मुंबईकरांची जीवनशैलीबदलली आहे. शिवाय, आहारातही पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश नसल्याने आजारांचा जोर वाढत आहे.योगा आणि व्यायाम करण्याकडे मुंबईकरांचा कल नसल्याने असंतुलित जीवनशैलीमुळे आजारांचा त्रास वाढला आहे. जीवनशैलीत समतोल राखण्यासाठी आहार, दैनंदिन जीवनशैली, योग-व्यायाम अंगीकारले पाहिजे.