Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३ हजार २८६ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:07 IST

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३ हजार २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ...

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३ हजार २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३७ हजार ८४३ झाली आहे. तर, दिवसभरात ३ हजार ९३३ रुग्ण बरे झाल्याने आजपर्यंत एकूण ६३ लाख ५७ हजार १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या राज्यभरात ३८ हजार ४९१ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के झाले आहे, तर राज्यात शुक्रवारी ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ७७६ नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७८ लाख १९ हजार ३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३७ हजार ८४३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ६५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.