Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वप्नपूर्ती’ची सोडत 29 नोव्हेंबरला

By admin | Updated: November 23, 2014 01:17 IST

सिडकोच्या खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांची सोडत 29 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांची सोडत 29 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. बेलापूर येथील ‘सिडको भवन’च्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ही सोडत काढण्यात येईल, असे सिडकोच्या वतीने कळवण्यात आले आहे.
अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी सिडकोच्या वतीने खारघर, सेक्टर-36  येथे ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 7क्4 तर अल्प उत्पन्न गटासाठी दोन हजार 45क् अशा एकूण तीन हजार 154 सदनिका आहेत. या प्रकल्पातील घरांसाठी जवळपास दोन लाख अर्ज विकले गेले आहेत. तर त्यापैकी 85 हजार 1क्7 अर्ज ‘सिडको’ला प्राप्त झाले आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात सोडत काढण्यात येईल, असे सिडकोकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याबाबतची तयारी न झाल्याने ही सोडत लांबणीवर पडली. आता ही सोडत 29 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. 
लाभार्थीची यादी सोडतीनंतर लगेच ‘सिडको’च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. सोडतीसाठी आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर व फादर अल्मेडा हे प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. निमंत्रितांना माहिती देण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एक बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)