Join us

म.रे.वर २९ ठिकाणे धोक्याची

By admin | Updated: October 5, 2016 03:32 IST

उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात हे रूळ ओलांडताना होतात. हे ससंदीय समितीच्या पाहणीत समोर आल्यानंतर अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात हे रूळ ओलांडताना होतात. हे ससंदीय समितीच्या पाहणीत समोर आल्यानंतर अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी रेल्वेकडून अहवाल तयार केला जात असून मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात २९ ठिकाणे धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवालात अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही नमूद केल्या आहेत. अहवाल येत्या आठवडाभरात जाईल. सीएसटी ते वाशी आणि सीएसटी ते विठ्ठलवाडी दरम्यान एकूण २९ धोकादायक ठिकाणे असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी एकूण ६८२ लोकांचा मृत्यू झाला असून यातील १३४ जण ठाणे ते कळवा दरम्यान तीन ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. सॅन्डहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे वसाहतीत येणारा मार्गपरळ कार्यशाळेबाहेरमाटुंगा कार्यशाळेबाहेरशीव ते कुर्ला दरम्यानविक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यानकुर्ला ते विद्याविहार दरम्याननाहूर ते मुलुंड दरम्यान नाणेपाड्याजवळठाणे स्थानक कळवा दिशेनेसिडको बस स्थानकाकडून ठाणे रेल्वे स्थानकादरम्यानविटावा ते ठाणे स्थानककळवा ते खारेगाव येथील रेल्वे फाटककळवा ते मुंब्रा दरम्यानदिवा रेल्वे फाटकठाकुर्ली रेल्वे फाटककोपर स्थानकाच्या दोन्ही बाजूंनाकल्याण ते शहाडकल्याण पत्री पूलविठ्ठलवाडी स्थानकवडाळा ते जीटीबी नगर मानखुर्द ते वाशी दरम्यान