Join us
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाख रुपयांचे सोने जप्त

By admin | Updated: February 5, 2017 00:40 IST

विमानतळावरून २८ लाख किमतीचे सोने जप्त केले आहेत. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशालाही बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : विमानतळावरून २८ लाख किमतीचे सोने जप्त केले आहेत. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशालाही बेड्या ठोकल्या आहेत. राशिद चुन्नू शेख असे प्रवासाचे नाव आहे. शुक्रवारी दुबईहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. दिल्लीतून तो सायंकाळी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. विमानतळाबाहेर पडताच त्याला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या सामानाच्या झडतीत ज्युसर मिक्सर सापडला. त्यामध्ये १०४५ ग्रॅम वजनाच्या सोने लपविण्यात आले होते. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.