Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात 27,500 एलईडी दिवे

By admin | Updated: July 30, 2014 00:33 IST

पायलेट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने महापालिकेने आता उर्वरित सुमारे 27,5क्क् दिवे खासगी संस्थांच्या माध्यमातून मोफत बसविण्यासाठी पावले उचलली आहेत.

अजित मांडके ल्ल ठाणो 
ठाणो महापालिकेचा एलईडी दिव्यांचा (स्ट्रीट लाइट्स) पायलेट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने महापालिकेने आता उर्वरित सुमारे 27,5क्क् दिवे खासगी संस्थांच्या माध्यमातून मोफत बसविण्यासाठी पावले उचलली आहेत. पायलेट प्रोजेक्टमध्ये लावलेल्या 31क् दिव्यांमुळे विजेची बचत झाली आहे. त्यामुळे हाच धागा पकडून पालिकेने आता उर्वरित दिवे  बसविण्याची ही संकल्पना पुढे आणली आहे. या वीज बचतीमधून यावर खर्च झालेले पैसे संबंधित संस्थेला दिवे बसविल्यानंतर अदा केले जाणार आहेत़ 
यापूर्वी ठाणो महापालिका हद्दीत सोडीअम व्हेपरचे दिवे दिसत होते. याचे आयुर्मान तर कमी होतेच, शिवाय विजेचे बिलही अधिक येत होते. त्यामुळे महापालिकेने दोन वर्षापूर्वी एलईडी दिव्यांची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार पहिला पायलेट प्रोजेक्ट राबविला गेला. यामध्ये स्टेशन परिसर, मासुंदा तलाव, राम मारुती रोड, मार्केट आदी भागात 31क् दिवे बसविण्यात आले. यासाठी 5क् लाखांचे अनुदान पालिकेला उपलब्ध झाले होते. त्यानंतर महिनाभरात या दिव्यांचा रिझल्ट पालिकेला मिळाला. येथील विजेचा वापर हा सुरुवातीला 7क्2 युनिट एवढा होता. परंतु या दिव्यांमुळे 35क् युनिटच वीज वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिकेच्या पैशांचीही बचत झाली. त्यानुसार महापालिकेने शहरातील सर्वच दिवे बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात आतापर्यंत 55क्क् दिवे बसविले आहेत. या दिव्यांचे आयुर्मान हे सुमारे 25 ते 3क् वर्षाचे आहे. 
दरम्यान, हे काम एस्को रुट्स (एनर्जी सेव्हिंग कंपनी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय आता पालिकेने घेतला आहे. 
महापालिका हद्दीत आजच्या घडीला 33क्क्क् दिवे आहेत. पैकी 55क्क् दिवे महापालिकेने बदलले असून उर्वरित दिवे हे मोफत बसविण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. 
या पद्धतीनुसार खासगी संस्थेच्या माध्यमातून मोफत दिवे बसविले जाणार असून त्याची निगा आणि देखभाल पुढील पाच वर्षे त्याच संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे दिवे लावल्याने सुमारे 7क् टक्के विजेची बचत होणार आहे. त्यामुळे जी बचत होईल त्यातील रक्कम ही टप्प्याटप्प्याने संबंधित संस्थेला दिली जाणार आहे. हे दिवे रिमोट मॅनेजमेंटवर सुरू होणार असून त्यावर कंट्रोलिंगसुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
शहरातील सर्व पोलचे जीआयएस बेसवर मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणता पोल, कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे आयुर्मान किती आहे, तो बंद आहे, अथवा सुरू आहे, कोणता दिवा कोणत्या पॅनलवर आहे, तो सुरू आहे, अथवा बंद आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एखादा पोल बदलायचा झाल्यास त्याची माहितीसुद्धा या प्रक्रियेमुळे सहज उपलब्ध होणार आहे.