Join us
Daily Top 2Weekly Top 5

२७०० नवीन पदांना मंजुरी

By admin | Updated: November 17, 2014 23:55 IST

. सध्या महानगरपालिकेत हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे विकासकामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

दीपक मोहिते, वसईसाडेचार वर्षांनंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २७०० पदांना नगरविकास खात्याने नुकतीच मंजुरी दिली. मनुष्यबळाअभावी गेल्या साडेचार वर्षांत महानगरपालिकेला विकासकामे करताना तारेवरची कसरत करावी लागली. शासनाच्या या दिरंगाईमुळे महानगरपालिकेला विकासकामे करण्यासाठी ठेकेदारांवर अवलंबून राहावे लागले. सध्या महानगरपालिकेत हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे विकासकामाला गती मिळण्याची शक्यता आहे.