Join us  

२७ मनसैनिकांना अटक, अन्य फरारी कार्यकर्त्यांनाही अटक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:36 AM

मुंबई : मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावणा-या एकूण २७ मनसैनिकांना आज दिवसभरात पोलिसांनी अटक केली.

मुंबई : मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावणा-या एकूण २७ मनसैनिकांना आज दिवसभरात पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील आणखी काही मनसैनिकांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली.सांताकु्रझ रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या उपविभागीय अध्यक्षासह सहा जणांना अटक केली. त्यांना २५ आॅक्टोबरपर्यत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे, संदेश गायकवाड, हेमंत गायकवाड, विनल दहींकर, चंद्रशेखर मडव, विशाल शिरवडकर अशी त्यांची नावे आहेत.एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चामध्ये पंधरा दिवसात रेल्वेस्थानक मोकळे करण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. अन्यथा सोळाव्या दिवशी ‘मनसे स्टाईल’ने फेरीवाल्यांना हटविण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी मनसैनिकांनी ठिकठिकाणी फेरीवाल्यांना हुसकावून लावले होते.फेरीवाल्यांवरील हल्ल्याप्रकरणी ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने अविनाश जाधव, महेश कदम, रवींद्र मोरे, रवींद्र सोनार आणि संदीप साळुंखे या पाच जणांना सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. यातील आणखी सहा ते सात जणांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली.कल्याण-डोंबिवली येथे गुन्हा दाखल झालेले मनसेचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी स्वत:हून स्थानिक पोलीस ठाण्यात हजर झाले. कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. त्यात कल्याणमधील कार्यकर्त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या बॉण्डवर तात्पुरता जामीन देण्यात आला तर डोंबिवलीतील आंदोलनकर्त्यांना एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी कल्याणमधील महात्मा फुले चौक आणि डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. यात कल्याणमधील १२ तर डोंबिवलीतील ११ अशा २३ जणांवर बेकायदा जमाव जमविणे, दंगा करणे, नुकसान करणे आदी गुन्हे दाखल झाले होते.वसई रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर हल्लाबोल करणाºया मनसेच्या चार पदाधिकाºयांना माणिकपूर पोलिसांनी रविवारी अटक केली. कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाºयानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. त्यानुसार वसईत रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात हल्लाबोल करण्यात आला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावले. त्यांच्या टपºया, गाड्यांची मोडतोड केली. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतांना पूर्व परवानगी न घेता आंदोलन केल्याचा माणिकपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून रविवारी मनसेचे जयेंंद्र पाटील, शिवाजी सुळे, जुबेर पठाण आणि विद्यानंद पवार या पदाधिकाºयांना अटक केली. वसई कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

टॅग्स :मनसेफेरीवाले