Join us

268 मुंबईकर गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू

By admin | Updated: August 19, 2014 09:10 IST

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मिळून एकूण 268 गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : दहीहंडीच्या दिवशी थर चढवताना काळजी घ्या, असे सर्व दहीहंडी पथकांना सांगितले असतानाही मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मिळून एकूण 268 गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी 29 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. नृत्य करताना चक्कर आलेल्या राजेंद्र आंबेकर (46) या गोविंदाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
दहीहंडीची उंची किती असावी, याचबरोबरीने किती वर्षानंतरच्या गोविंदांनी दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे, या सगळ्या विषयावर मोठय़ा प्रमाणात चर्चा करण्यात आली होती. याचा थोडाफार परिणाम दहीहंडीच्या दिवशी झालेला दिसला़ कारण, 2क्13 च्या दहीहंडीच्या दिवशी एकूण 365 गोविंदा जखमी झाले होते, तर यंदा 268 गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी 3 गोविंदाच जास्त जखमी असल्याचे समजते आहे. 
महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये 18 जण दाखल झाले आहेत. केईएम रुग्णालयात 13 तर सायन रुग्णालयात 5 रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील 17 उपनगरीय रुग्णालयांमध्ये एकूण 98 जखमी गोविंदा दाखल झाले असून त्यापैकी 8 जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. कुर्ला भाभा रुग्णालयामध्ये दाखल झालेला गोविंदा स्वप्निल हडिवरेकर (33) याच्या डोक्याला मार लागला आह़े हा गोविंदा गंभीर जखमी झाला असल्यामुळे त्याला पुढच्या उपचारासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. विक्रोळी कन्नमवारनगर येथील सुळे रुग्णालय, राजावाडी रुग्णालय येथे प्रत्येकी 1 गोविंदाला दाखल करण्यात आले असून आंबेडकर रुग्णालयामध्ये 2 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वाची प्रकृती स्थिर आहे.
 
व्ही.एन. देसाई : रुग्णालय दाखल करण्यात आलेल्या एका गोविंदाला प्लास्टिक सजर्रीची आवश्यकता असल्यामुळे त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलुंड अग्रवाल रुग्णालयातील गोविंदालाही हाताला प्लास्टिक सजर्रीची आवश्यकता असल्यामुळे त्याला सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. या सर्वाची प्रकृती स्थिर आहे. जे.जे. रुग्णालयात दुपारी एकच गोविंदा दाखल झाला.
 
कुर्ला भाभा : रुग्णालयामध्ये स्वप्निल हाडिवरेकर (33) या गोविंदाला दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्याला केईएममध्ये दाखल करण्यात आले.  
 
सायन : रुग्णालयात एकूण 
25 जखमी गोविंदा आले असून यापैकी 5 रुग्णांना दाखल करण्यात आले असून यापैकी 1 जणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या डोक्याला मार बसलेला असून त्याच्या कानातून रक्त येत होते. बाकी 2 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
 
केईएम : रुग्णालयामध्ये एकूण 67 गोविंदा दाखल झाले असून त्यापैकी 13 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी 12 जणांना ऑर्थाेपेडिक्स विभागात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 1 गोविंदाचा मणका फ्रॅक्चर झाला आहे.
 
नायर : रुग्णालयामध्ये 11 जखमी गोविंदा
आले होते. मात्र, या सर्वावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे.
 
जे.जे. : रुग्णालयामध्ये दुपारी 1 गोविंदा आला होता. त्याच्या कमरेला मार बसला होता, त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले आहे.  
 
दहीहंडीच्या आयोजनातील आवाजाच!
आवाज डेसिबल्समध्ये
संकल्प प्रतिष्ठान 
जांबोरी मैदान, वरळी 
(दुपारी 12.35 वाजता)
 
अॅम्प्लिफायरशिवाय : 7क्.1
इलेक्ट्रिक सिस्टीमसहित : 94.1
डीजेसहित : 98.1
 
साहेब प्रतिष्ठान 
शिवसेना भवन, दादर
(दुपारी 3.35 ते 4 वाजेर्पयत)
अॅम्प्लिफायरशिवाय : 71.2
इलेक्ट्रिक सिस्टीमसहित : 98.5
डीजेसहित : 1क्6.8
 
राम कदम दहीहंडी
घाटकोपर
(दु. 5.1क् ते 
5.17 वाजेर्पयत)
प्रवेशद्वाराजवळ : 86
 
 
नृत्य करताना एका गोविंदाचा ठाण्यात मृत्यू 
 
ठाणे : मुंबई आणि ठाण्यात दाखल झालेल्या गोविंदांनी उंच मानवी मनोरे उभारले. पण, हे मानवी मनोरे उभारताना कोसळलेल्या थरांमुळे ठाण्यात सायंकाळर्पयत 29 गोविंदा जखमी झाले. यात एका महिला गोविंदाचा समावेश आहे. याच दरम्यान मानवी मनोरे उभारल्यानंतर नृत्य करताना चक्कर आलेल्या राजेंद्र आंबेकर (46) या गोविंदाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
ठाण्यात गतवर्षी 2० जण जखमी झाले होते. त्यामध्ये 14 महिला गोविंदांचा समावेश होता. मृत गोविंदा राजेंद्र धोंडू आंबेकर हे लालबागच्या गणोशनगरचे रहिवासी असून ते येथील साई सदन गोविंदा पथकाचे सदस्य आहेत. ठाणो वर्तकनगर परिसरात संस्कृती प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये सलामी दिल्यानंतर राजेंद्र हे त्या ठिकाणी लावलेल्या डीजेवर नृत्य करीत असतानाच त्यांना चक्कर आली. सिव्हीलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन लाखांचे अर्थसाह्य जाहीर केले आहे. याचदरम्यान ठाणो शहर, कळवा-मुंब्रा व नवी मुंबई या ठिकाणी हंडी फोडण्याच्या प्रयत्नात असलेले 29 गोविंदा जखमी झाले आहेत.