Join us  

राज्यात दिवसभरात कोरोनाचे २६० बळी, ९५०९ नवीन रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 5:31 AM

मृत्युदर ३.५३ टक्के; पावणेतीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

मुंबई : राज्यात रविवारी पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. राज्यात दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९ हजार ५०९ नवीन रुग्ण व २६० मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. सध्या १ लाख ४८ हजार ५३७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून मृतांचा आकडा १५ हजार ५७६ आहे. मृत्युदर ३.५३ टक्के झाला आहे.दिवसभरातील २६० मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे २, ठाणे मनपा १४, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा १२, उल्हासनगर मनपा २, भिवंडी-निजामपूर मनपा ३, मीरा-भार्इंदर मनपा ७, पालघर ४, वसई-विरार मनपा १५, रायगड ५, नाशिक मनपा ८, अहमदनगर ७, धुळे १, धुळे मनपा ३, जळगाव मनपा २, पुणे ११, पुणे मनपा २५, पिंपरी-चिंचवड मनपा १५, सोलापूर ८, सोलापूर मनपा ४, सातारा ६, कोल्हापूर २, कोल्हापूर मनपा १, सांगली २, नागपूर मनपा २ आणि चंद्रपूर मनपा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.हे.मुंबईत आणखी ४९ जणांनी गमावला जीवच्मुंबईत रविवारी १ हजार १०५ रुग्ण आढळले तर ४९ मृत्यू झाले. परिणामी, शहर-उपनगरात १ लाख १६ हजार ४३६ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ६ हजार ४४७ झाला आहे.च्मुंबईत आतापर्यंत ८८ हजार २९९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २१ हजार ३९४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अन्य कारणांमुळे मुंबईत २९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई