Join us
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळांचे २५६ वर्ग गळके

By admin | Updated: June 14, 2015 23:06 IST

उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, तालुक्यात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सुमारे

बिर्लागेट : उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, तालुक्यात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सुमारे २५६ नादुरुस्त वर्गांमध्ये बसावे लागणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यात गळक्या व नादुरुस्त वर्गांत बसूनच मुलांना शिक्षण घ्यावे लागणार आहे. दुरुस्तीसाठी १ कोटी १७ लाखांची गरज असून प्रशासन मात्र ढिम्म आहे.कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२५ शाळांत सुमारे ३३३ वर्गखोल्या आहेत. त्यात ४७८ शिक्षक १२ ते १३ हजार विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. पावसाळा सुरू झाल्याने गळक्या व नादुरुस्त शाळांचा विषय ऐरणीवर आला आहे. नादुरुस्त शाळांची माहिती घेण्याच्या सूचना कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी शिक्षण विभागाला दिल्या. त्यानुसार, गोवेली केंद्रामध्ये पिंपळोली, म्हसकळ, मानिवली, नांदप, आपटी, वाहोली, रायते, रेवती, वाहोली, बोडाखडक अशा १३ गावांमधील २२ वर्गांच्या दुरुस्त्या, गुरवली केंद्रात ११ गावांत २१ , खडवली ८ गावांत १०, खोणी केंद्रात १० गावांत २१ , मामणोली १५ गावांत ३०, म्हारळ केंद्रात १७ गावांत ५२ , सोनारपाडा १२ आणि दहिसर १३ गावांत ३२ वर्गखोल्यांची दुरुस्ती सुचविली आहे. या शिवाय काही गावातील वर्गखोल्यांची स्थिती जवळपास तशीच आहे. (वार्ताहर)