Join us
Daily Top 2Weekly Top 5

दामूनगरवासीयांना २५ हजारांची मदत

By admin | Updated: December 24, 2015 02:00 IST

दामूनगरमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर येथील झोपडीधारकांना २५ हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई : दामूनगरमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर येथील झोपडीधारकांना २५ हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पीडितांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे आ. प्रकाश सुर्वे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या कृतीसमितीच्या बैठकीत प्रकाश सुर्वे यांनी यासंबधीची मदत करण्यात यावी, अशा आशयाची आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सुर्वे यांनी सांगितले.