Join us  

मुंबईत कोरोनाचे २५ नवे रुग्ण; एका बाधिताचा मृत्यू; १२ जण बरे होऊन घरी गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 6:20 AM

राज्यात ३६९ आणि मुंबईत १२७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात काही दिवसांपासून काेराेनाचे नवीन रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी  राज्यात एकूण ११७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील २५ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ३६९ आणि मुंबईत १२७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

नाशिक येथील एका कोरोनाबाधिताचा गुरुवारी मृत्यू झाला. तसेच गुरुवारी १२ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत जे २५ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ रुग्णांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी ९ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ३४२ चाचण्या करण्यात आल्या.  ‘जेएन वन’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण

मुंबई मनपा     २५ ठाणे मनपा     १३ नवी मुंबई मनपा     १२ कल्याण-डोंबिवली मनपा     ०३ पनवेल मनपा     ०३रायगड     ०२ 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस