Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून २५ लाखांची मदत

By admin | Updated: August 20, 2015 00:49 IST

अंदमान पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला महापालिकेने २५ लाखांची मदत करण्याचा निर्णय महापौर स्नेहल आंबेकर यांच्या

मुंबई : अंदमान पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला महापालिकेने २५ लाखांची मदत करण्याचा निर्णय महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. खासदार राहुल शेवाळे यांनी महापौरांना यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी नमूद केले होते की, विश्व मराठी साहित्य संमेलानाला आर्थिक सहाय्य करण्या करता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. हा निधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळास देण्याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला घेऊन मागणी मंजूर करावी. यानुसार, बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत पत्र चर्चेस आणले. आणि संमेलनासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला. (प्रतिनिधी)