Join us
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात २४ वॉर्ड!

By admin | Updated: May 11, 2016 03:41 IST

रस्ते घोटाळ्याच्या चौकशीचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे़ यामध्ये २२६ ठिकाणी पालिकेचे दक्षता पथक रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणार आहे़ या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी

मुंबई: रस्ते घोटाळ्याच्या चौकशीचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे़ यामध्ये २२६ ठिकाणी पालिकेचे दक्षता पथक रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणार आहे़ या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले असल्याने, २४ वॉर्डांमध्ये एकाच वेळी तपासणी होणार आहे़३४ रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आली आहे़ यासाठी जबाबदार दक्षता व रस्ते विभागाच्या तत्कालीन प्रमुख अभियंत्यांना चौकशीच्या पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आले़ त्यानंतर, आता चौकशीचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू होणार आहे़ यासाठी दक्षता विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे़ दक्षता खात्याच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी होणार आहे़ मात्र, रस्त्यांची संख्या जास्त असल्याने संबंधित विभाग कार्यालयातील कामगार व अन्य मदत चौकशी वेळी घेतली जाणार आहे़ ठेकेदार आणि सल्लागार यांना चौकशीच्या वेळी घटनास्थळी हजर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)छाननी पथकात यांचा समावेश दक्षता खात्याच्या प्रत्येक छाननी पथकामध्ये सहा ते सात सदस्यांचा समावेश असणार आहे़ यामध्ये दक्षता खात्याचा सहायक अभियंता, सहअभियंता व विभागातील कामगार यांचा समावेश असणार आहे़ छाननी करण्यात येणाऱ्या रस्त्यांवर छोटा खड्डा करून दर्जा तपासण्यात येणार आहे़रस्ते कामाचा दर्जा तपासणारत्यानुसार, हे पथक शहर, पश्चिम व पूर्व उपनगरामध्ये फिरणार आहे़ पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक रस्त्यांच्या कामाची छाननी होणार आहे़ त्यानंतर शहर व पूर्व उपनगरातील रस्त्यांचाही दर्जा तपासण्यात येणार आहे़