Join us  

विधानसभेत 'पाटीलकी'; चंद्रकांत पाटलांसह राज्यभरातून 25 पाटील विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 1:15 PM

राज्यभरातील आमदार ; सर्वपक्षीयांचा आहे समावेश

कुमार बडदे 

मुंब्रा : राज्यातील राजकारणात तसेच इतर क्षेत्रात आणि ग्रामीण भागात पाटील या आडनावाचा दबदबा आहे. यामुळे काही जण त्यांचे नाव वजनदार व्हावे, यासाठी मूळ आडनावापुढे पाटील लावतात. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेले पाटील आडनावाचे तब्बल 25 आमदार चौदाव्या विधानसभेत दिसणार आहेत. तेराव्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोनने जास्त आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाटलांपैकी नऊ मावळत्या विधानसभेतही आमदार होते. चौदाव्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या पाटलांमध्ये सर्वाधिक १० राष्ट्रवादी, चार शिवसेनेचे, तर काँग्रेस आणि भाजपच्या निवडणूक चिन्हांवर प्रत्येकी तीन जण निवडून आले आहेत. तसेच मनसे आणि बहुजन विकास आघाडीचा प्रत्येकी एक जण पाटील आहे. याचप्रमाणे दोन अपक्षही आहेत. निवडून आलेल्या पाटील नावाच्या आमदारांमध्ये राजेश पाटील (बोईसर), राजू पाटील (कल्याण, ग्रामीण), रवींद्र पाटील (पेण), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), चंद्रकांत पाटील (कोथरूड), राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), शहाजी पाटील (सांगोला), मकरंद पाटील (वाई), बाळासाहेब पाटील (कराड), राजेश पाटील (चंदगड), ऋ तुराज पाटील (कोल्हापूर, दक्षिण), पी.एन. पाटील (करवीर), राजेंद्र पाटील (शिरोळ), जयंत पाटील (इस्लामपूर), सुमनताई पाटील (तासगाव, कवठे महांकाळ), राहुल पाटील (परभणी), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), कैलास पाटील (उस्मानाबाद) राजाजगजितसिंह पाटील (तुळजापूर), कुणाल पाटील (धुळे), गुलाबराव पाटील (जळगाव, ग्रामीण), अनिल पाटील (अमळनेर), किशोर पाटील (पाचोरा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), चिमणराव पाटील (एरंडोल) यांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबईचंद्रकांत पाटीलविधानसभा निवडणूक 2019निवडणूक