Join us

चेंबूरच्या सिंधी सोसायटीत एकाच इमारतीमध्ये २४ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:06 IST

मुंबई : चेंबूर येथील सिंधी सोसायटी परिसरात एकाच इमारतीमध्ये २४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सिंधी सोसायटी परिसरात ...

मुंबई : चेंबूर येथील सिंधी सोसायटी परिसरात एकाच इमारतीमध्ये २४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सिंधी सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेने ही इमारत सील केली असून या इमारतीमध्ये घरकाम करणाऱ्या महिला तसेच इतरांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. एकाच वेळी २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने या परिसरात सर्व नागरिक सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इमारतीतील इतर नागरिकांसाठी कम्युनिटी किचन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधी सोसायटी परिसरात पाचशे हून अधिक नागरिक राहतात. तसेच शेजारीच लालडोंगर व कोकण नगर यासारखे दाट लोकवस्ती असणारे परिसर आहेत. त्यामुळे येथे कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो. सिंधी सोसायटी परिसरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लालडोंगर व कोकण नगर या परिसरांमध्ये नियमित निर्जंतुकीकरण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.