Join us
Daily Top 2Weekly Top 5

23 वर्षानंतर चोरीतून सुटका

By admin | Updated: August 24, 2014 01:54 IST

कुलाबा येथे 1991 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणातून एका आरोपीची अखेर सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी सुटका केली़अकबर शेख असे या आरोपीचे नाव असून, तो डोंगरी येथे राहणारा आह़े

मुंबई : कुलाबा येथे 1991 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणातून एका आरोपीची अखेर सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी सुटका केली़
अकबर शेख असे या आरोपीचे नाव असून, तो डोंगरी येथे राहणारा आह़े चोरी झाली त्यावेळी त्याचे वय अंदाजे 23 वर्षे होत़े
कुलाबा येथे एका रहिवासी इमारतीमध्ये ही चोरी झाली होती़ चोरांनी घरातील 45 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता़ त्यात सोने व इतर गोष्टींचा समावेश होता़ काही दिवसांतच पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली़ त्यात शेखही होता़ त्यानंतर या आरोपींना जामीन झाला, तेव्हापासून या आरोपींचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता़ 
अखेर गेल्या वर्षी पोलिसांनी शेखला अटक केली़ या चोरीप्रकरणी त्याच्याविरोधात आरोपपत्र 
दाखल झाले व याचा खटला सुरू झाला़ यात अॅड़ प्रकाश साळशिंगीकर यांनी शेखच्यावतीने युक्तिवाद केला़ सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यासाठी चार साक्षीदार तपासल़े 
मात्र ही चोरी करणारे खरे चोर पोलिसांना कधी सापडलेच नाहीत़ यात शेखला नाहक अडकवण्यात आल्याचा दावा अॅड़ साळशिंगीकर यांनी केला़ तसेच शेखविरोधात एकही सबळ पुरावा सादर झाला नाही़ त्यामुळे न्यायालयाने शेखची या आरोपातून सुटका केली़