Join us  

म्हाडाच्या २३ इमारती अतिधोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:30 AM

म्हाडामार्फत दरवर्षी धोकादायक इमारतींचे पावसाळ्याआधी सर्वेक्षण करण्यात येते.

मुंबई : म्हाडामार्फत दरवर्षी धोकादायक इमारतींचे पावसाळ्याआधी सर्वेक्षण करण्यात येते. या वर्षीही म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये एकूण २३ इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या. या इमारतींना म्हाडामार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीमध्ये उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४ हजार २८६ इतकी झाली आहे. सर्वेक्षणांती यातील २३ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या २३ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांपैकी पन्नास टक्के रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या २३ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ५०७ निवासी आणि ३०८ अनिवासी असे एकूण ८१५ गाळे आहेत.या २३ इमारतींच्या ठिकाणी आम्ही स्वत: भेटी देऊन आढावा घेतला आहे. यातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रहिवाशांना संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित केले आहे़ सध्या सुमारे दोनशे रहिवासी या इमारतींमध्ये राहत आहेत. या रहिवाशांनाही आवश्यकतेनुसार स्थलांतरित करू, असे म्हाडाच्या इमारत इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर म्हणाले.>सर्वेक्षणातील सेस इमारती१४४, एम जी रोड, एक्स्प्लेन्ड मेन्शन२०८-२२० काझी सय्यद स्ट्रिट२२-२४, उमरखाडी २ री क्रॉसलेन, मुंबई सिराज लेन१४५-१५१, आरसी वालाबिल्डिंग१५२-१५४, चिमना बुचर स्ट्रीट१०१-१११ बारा इमाम रोड,७४, निझाज स्ट्रीट,१२३, किका स्ट्रीट३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी.रोड,२१८-२२०, डी १२३१ (१) & डी-१२३१(३) राजाराम मोहन राय मार्ग५ जे सुनंदा बिल्डिंग, डी-१६१५(२) दुभाष लेन, गिरगाव,४१९ नूर मोहम्मद बेग, मोहम्मद कंपाऊंड, डी-४६९ व्ही.पी.रोड,४४३ वांदेकर मेंंशन, डी-४३१, डॉ.दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगाव,२२६- २२८, राजाराम मोहन मार्ग, गिरगाव,२४१-२५१, डी-११९४ राहाराम मोहन रॉय मार्ग, गिरगाव,५८-खत्तर गल्ली,मधुसूदन बिल्डिंग खत्तरगल्ली, गिरगाव,६९-८१, खेतवाडी ३री गल्ली, गणेश भुवन,इमारत ३९, चौपाटी,सी फेस,सी एस नं.८२९,१/८२९ आणि ८३० दादाभाई चाल क्रमांक ५, लोअर परेल,३७ डी, बॉम्बे हाउस, डॉकयार्ड रोड,२३ सक्सेस रोड, माझगाव,१-१ ए, ३-३ ए, हाथीबाग, डी.एन.सिंग रोड.

टॅग्स :म्हाडा