Join us
Daily Top 2Weekly Top 5

२२४ विशेष फेऱ्या

By admin | Updated: July 25, 2015 01:47 IST

गणेशोत्सव काळात मुंबई तसेच ठाणे विभागातून कोकणात ट्रेनने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेच्या

मुंबई : गणेशोत्सव काळात मुंबई तसेच ठाणे विभागातून कोकणात ट्रेनने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेच्या सहकार्याने जादा फेऱ्या सोडण्यात येतात. यंदा एकूण २२४ फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशा सूचनाच रेल्वेमंत्र्यांकडून रेल्वेला करण्यात आल्या आहेत. मात्र मागील वर्षाशी तुलना केली असता फक्त यंदा दहा फेऱ्यांचीच भर पडल्याचे समोर आले आहे. यंदाचा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात येत असून त्याचे आरक्षण जुलै महिन्यात सुरू झाले आहे. मध्य रेल्वेकडून सुरुवातीला ६0 जादा फेऱ्यांची घोषणा करण्यात आली असून त्याच्या आरक्षणालाही सुरुवात झाली आहे. मागील वर्षी २१४ फेऱ्या सोडण्यात आल्या. यात १३0 ट्रेन आरक्षित, ४६ प्रीमियम आरक्षित आणि ३८ अनारक्षित ट्रेनचा समावेश होता. २0१४ ची २0१३ शी तुलना करता २0.२२ टक्के अधिकच ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. यंदा मात्र ती टक्केवारीही कमी आहे. २0१४ मध्ये २१४ पैकी १७२ विशेष ट्रेनमधून १ लाख २१ हजार १८ प्रवाशांनी प्रवास केल्याचे त्या वेळी कोकण रेल्वेकडूनच काढलेल्या प्रसिद्धिपत्रकातून सांगण्यात आले होते. त्यामुळे यंदा घोषित करण्यात आलेल्या जादा फेऱ्यांची संख्या पाहता ती फारच कमी असल्याचे दिसते.