Join us  

महाराष्ट्राला वाढवून मिळाल्या एमबीबीएसच्या २,०२० जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 4:33 AM

मराठा समाजास मिळणार १,६५0 जागा

- अतुल कुलकर्णी मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एमबीबीएसच्या २०२० जागा याच शैक्षणिक वर्षापासून मंजूर करण्याचा निर्णय दिल्लीत झाला. मराठा आरक्षणासाठी १,६५० जागा वाढवून देण्यास केंद्राने मान्यता दिली असली, तरी निर्णय सोमवारी होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.दोन नवीन आरक्षणामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे जागांमध्ये वाढ करण्याची मागणी घेऊन गेलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. या २०२० पैकी ११४० सरकारी तर ८८० खासगी महाविद्यालयांना जागा मिळतील. मराठा आरक्षणाच्या ८५० जागा सरकारी, तर ८०० जागा खासगी महाविद्यालयांना मिळतील. मात्र, तो निर्णय सोमवारी होईल.सात नवी कॉलेजेसपुणे, मिरजला पॅरामेडिसिन इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासही मान्यता दिली. सिंधुदुर्ग, नंदुरबार, बुलडाणा, परभणी, अमरावती, नाशिक, सातारा, जिल्हा रुग्णालयांना आता वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा देण्याचाही निर्णय घेण्यात आला.जळगावला कॅन्सर इन्स्टिट्यूटराज्याने नॅशनल कॅन्सर ग्रीड, व्हर्च्युअल ट्यूमर बोर्ड व कॅन्सर फेलोशिपचे कार्यक्रम घेतले आहेत. त्यामुळे जळगावला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे.