Join us  

गोवंडी, मानखुर्दमधून कचऱ्यातून २२ टन खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 7:00 AM

मुंबईत सर्वाधिक झोपडपट्टी विभाग असलेल्या गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर या एम पूर्व विभागातून दररोज ३० टन कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यातून दररोज साधारणपणे २२ टन एवढे खत तयार होत असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेतांमध्ये वापरले जात आहे.

मुंबई  - मुंबईत सर्वाधिक झोपडपट्टी विभाग असलेल्या गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर या एम पूर्व विभागातून दररोज ३० टन कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यातून दररोज साधारणपणे २२ टन एवढे खत तयार होत असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेतांमध्ये वापरले जात आहे.एम पूर्व विभागात सुमारे आठ लाख २६ हजार ७८४ एवढी लोकसंख्या आहे. या विभागातील ८५ टक्के लोक झोपडपट्टी परिसरामध्ये राहत असल्याने येथे कचºयापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करणे, हे एक आव्हान होते. त्यामुळे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत या विभागात कचºयापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ‘कम-पोस्ट’ या संस्थेने उभारलेल्या या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ५० टन एवढी आहे.सध्या या प्रकल्पात दररोज ३० टन एवढा कचरा वापरून खत तयार केले जात आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत या प्रकल्पाचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू होणार असून त्यानंतर दररोज ५० टन कचरा वापरला जाणार आहे. या कचºयातून दररोज जेवढा कचरा वापरला जातो, त्यापासून साधारणपणे ७५ टक्के एवढे खत ४८ तासांनंतर मिळते. या प्रकल्पाची क्षमता दररोज १०० मेट्रीक टनपर्यंत वाढविण्याचेदेखील प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.सध्या एम पूर्व विभागात दररोज सुमारे ३९० टन एवढा कचरा संकलित होत आहे. यापैकी ३० टन कचरा या प्रकल्पात वापरला जात आहे.या प्रकल्पाची क्षमता १०० टन करण्याचा निर्धार एम पूर्व विभागाने केला आहे. ज्यामुळे भविष्यात विभागातून संकलित होणाºया एकूण कचºयापैकी सुमारे २५ टक्के कचºयाचा खतनिर्मितीसाठी वापर होईल अशी अपेक्षा आहे.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे एम पूर्व विभागातून क्षेपणभूमीवर वाहून नेल्या जाणाºया कचºयात सध्या ३० टनांची घट झाली आहे. 

टॅग्स :कचरा प्रश्नमुंबईबातम्या