मुंबई : निवडणुकीच्या काळात मुंबईकरांचे डोळे दिपवणारी कोट्यवधी रुपयांची तरतूद नवीन आर्थिक वर्ष उजाडले तरी पालिकेच्या तिजोरीतच धूळ खात आहे़ पायाभूत सुविधांसाठी राखीव आठ हजार कोटींच्या तरतुदीपैकी जेमतेम २२ टक्केच रक्कम विकासकामांवर खर्च झाली आहे़ त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांमध्ये ७८ टक्के रक्कम खर्च करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे़२०१४-१५ या आर्थिक वर्षात विकासकामांसाठी (जल व मलनिस्सारण प्रकल्प वगळता) आठ हजार १११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ यापैकी जुलैपर्यंत दहा टक्के रक्कम खर्च करण्यात आली़ विशेष म्हणजे महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विभागांमध्येच निधी खर्च करण्यामध्ये प्रशासकीय उदासीनतेचे चित्र यंदाही कायम आहे़ विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब उजेडात आली़ (प्रतिनिधी)
विकासकामांवर २२ टक्केच खर्च
By admin | Updated: December 19, 2014 01:28 IST